Pune UPSC Exam : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाला होता, असा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोपामुळे युपीएससीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससीची बदनामी झाली होती. आता पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आलेय.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेतील आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. युपीएससीच्या नागरी सेवांसाठीच्या मुख्य परीक्षेतील निंबंध आधीच प्रसिद्ध झाल्याचा आरोप पुण्यातील विद्यार्थ्यांनी केला आहे. देअर इज नो पाथ टु हॅपिनेस, हॅपिनेस इज द पाथ...हा निंबध खासगी क्लासने आधीच प्रसिद्ध केला होता. हाच निंबधाचा विषय युपीएससीच्या पूर्व परीक्षेत जसाच्या तसा आला, अशा आरोप विद्यार्थ्यांनी केल आहे.