रितेश-जिनिलिया ही महाराष्ट्राची खूप आवडती जोडी आहे. या जोडीला चाहत्यांकडून नेहमीच प्रेम आणि माया मिळत असेत. यांच्या बाबत कोणतेही अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. यांना दोन क्युट मुलं आहेत ज्यांच्यावर रितेश-जिनिलियाने खूप चांगले संस्कार केले आहेत. रितेश-जिनिलिया एकमेकांवर प्रेम व्यक्त करायला कसलाच विचार करत नाही. नेहमी एकमेकांचा आदर ठेवतात.