भारतीय संघ अडचणीत असताना आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या जोडीने भारताला संकटातून बाहेर काढलं आहे. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत १४४ धावांवर भारताचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनची जोडी मैदानावर चांगलीच जमली. एकवेळ अशी होती, जेव्हा भारतीय संघाला २०० धावांपर्यंत पोहचणंही कठीण झालं होतं. मात्र या दोघांनी १५० धावांची भागिदारी केली. दरम्यान चेन्नईचा लोकल बॉय आर अश्विनने आपलं शतक पूर्ण केलं.