Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नाकारल्याचा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळेच आता होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे वृत्त हाती आलेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आपल्या कोट्यातली दहा टक्के जागा मुस्लिम उमदेवारांना देणार आहेत.
अजित पवारांची सावध भूमिका, मुस्लिम उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय - आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याचे समोर आलेय. जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे.