Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल
Cancer Patient Watching Movie During Operation Theater: ज्युनिअर एनटीआरचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहे. एका चाहत्याने चक्क शस्त्रक्रिया सुरु असताना ज्युनिअर एनटीआरचा चित्रपट पाहिला आ
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणजे ज्युनिअर एनटीआर. ज्युनिअर एनटीआरचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहे. एका चाहत्याने चक्क शस्त्रक्रिया सुरु असताना ज्युनिअर एनटीआरचा चित्रपट पाहिला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य कलाकारांची फॅनफॉलोविंग खूप तगडी आहे. अनेक चाहते तर त्यांची पूजा करतात. त्यांच्या नावाने नवस बोलतात. अनेक सुपरस्टार्सची तर मंदिरेदेखील बांधली आहेत. अशातच ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याचा व्हिडिओ समोर आला आहे.