Maharashtra Assembly Election : मविआत बिघाडीची चिन्हं, जागावाटपावरून डावे आणि छोटे पक्ष नाराज

Maharashtra Election 2024 : जागावाटपावरुन मविआतील वाद आता चव्हाट्यावर आलाय.

National

Maharashtra Assembly Election 2024 : जागावाटपावरुन मविआतील वाद आता चव्हाट्यावर आलाय, कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, त्यामुळे जागावाटपला वेग आलाय. पण मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा दावा मविआतील छोट्या पक्षांनी केला आहे. सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे मविआतील छोट्या पक्षाने वेगळा निर्णय घेण्याचा विचार जवळपास निश्चित केला आहे. १६ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये छोट्या पक्षाच्या प्राकतिक आघाडीने बैठक बोलवली आहे. पत्रकार परिषद घेऊन यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्याशिवाय मविआमध्ये इतर सहा छोटे पक्ष आहेत. मविआचे विधानसभेचे जागावाटप निश्चित झालेय. त्यामध्ये छोट्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली जातेय. शेकाप, भाकप, माकप, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण आणि समाजवादी या सहा पक्षांची अंतर्गत प्रागतिक आघाडी आहे. यांनी मविआकडे ३६ जागांची मागणी केली होती. पण मविआने सध्या आमदार असलेल्या चार जागा दिल्या. त्यामुळे नाराजी समोर आली आहे. Politics उपपती ॐ डिंडारः कट्टर शिया Assembly Election होणार

You can share this post!


Related Posts