Mahavikas Aaghadi CM Face Candidate: विधानसभा निवडणुकांची अवघ्या काही दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे निवडणुकांची तयारी सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही मविआच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.