IND vs BAN Latest Updates in Marathi: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी आर अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. पहिल्या दिवशी भारताने ३३९ धावा केल्या आहेत. भारतीय संघ मजबूत स्थितीत असला तरीही ३ कारणांमुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बांगलादेशच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. सुरुवातीच्या एका तासात हसन महमूदने भारताच्या ३ प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं.